मलकापूर : बेलाड येथील गट नं 174 श्रीक्रुष्ण जगन्नाथ संबारे यांच्या शेतातील डिपी सहा महिन्या अगोदर वारा उधान व पावसामुळे पडली होती ,
त्यामुळे सदर शेतातील विदुत प्रवाह खंडीत झाला होता.तरी या संदर्भात शेतकर्याने वारंवार निवेदन देवून सुद्धा त्यावर योग्य ती उपाय योजना करण्यात आली नाही.नंतर सदर शेतकर्याने संभाजी ब्रिगेड मलकापुर यांच्या कडे संपर्क साधत संपुर्ण प्रकरण सांगीतल्यावर संभाजी ब्रिगेड मलकापुर तालुका अध्यक्ष राहुल संबारे व तालुक्का कार्यकारणी यांच्या वतीने शेतकर्याच्या समस्या सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांना घेराव घालत शेतकऱ्यांला आठ दिवसात न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा देतांच दोन दिवसात सदर शेतकर्याच्या शेतातील विदुत पोल चे काम व डिपी चे काम चालू केले पुर्णत्वास आणले त्या बद्दल संबधित शेतकर्याने संभाजी ब्रिगेड मलकापुर तालुका अध्यक्ष राहुल संबारे, संपर्क प्रमुख सुनिल संबारे, शहर अध्यक्ष राहुल यादगिरे, तालुका कार्याध्यक्ष पवन संबारे,बेलाड शाखा अध्यक्ष गजानन संबारे, बेलाड ग्रामपंचात सदस्य ईच्छाराम संबारे,माधव रत्नपारखी, गणेश सोनुने, दिपक निबोळकर,मंगेश संबारे,अभिषेक संबारे,गणेश दहिभाते,गणेश संबारे,या सर्वांचे आभार मानत शेतकर्यांसाठी लढणारी संभाजी ब्रिगेड हिच आहे असे सागंत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
Post a Comment