Hanuman Sena News

चांडक विद्यालयाच्या विज्ञान योद्ध्यांचा तालुका विज्ञान प्रदर्शनात दिमाखदार विजय..


मलकापूर: नुकतेच मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिलाधर भोजराज चांडक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरावर वर्चस्व सिद्ध केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले. चांडक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तालुका विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशाचा नवीन अध्याय लिहिला आहे.समयस्फूर्त भाषण स्पर्धा (माध्यमिक गट) मध्ये कु. प्रेरणा रमेश पारस्कर हिने आपल्या प्रभावी सादरीकरणाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या वक्तृत्वाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक गट) मध्ये कु. श्रावणी अनिल महाकाळे हिने आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करून तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे प्राथमिक विभागाला सन्मान प्राप्त झाला आहे.याशिवाय, शैक्षणिक साहित्य निर्मिती (माध्यमिक गट) या श्रेणीत श्री. सुधाकर राठोड सर यांनी आपल्या नाविन्यपूर्ण विचारांद्वारे आणि सर्जनशील साहित्य निर्मितीच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि श्री. राठोड सर यांच्या विजयाबद्दल शाळेच्या संपूर्ण परिवारात आनंदाचे वातावरण आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या यशामध्ये शाळेच्या विज्ञान शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाची मोठी भूमिका आहे.शाळेचे मुख्याध्यापक डॉ. जयंत राजूरकर आणि सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व श्री. राठोड सर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Post a Comment

Previous Post Next Post