मलकापूर : ऐतिहासिक नोंद असलेले मलकापूर नगर मधील वस्तूमध्ये हेतू पुरस्कार बदल करून त्यांचे इतीहासिक महत्त्व संपवण्याचे तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या अवैध गो तस्करी, हिवाळ्याच्या थंडीचा लाभ घेऊन गो वंश चोरी थांबविने व महाराष्ट्र शासनाच्या गोवंश हत्या कायद्याची अंमल बजावणी करिता आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल मलकापूर द्वारे उपविभागीय अधिकारी साहेब यांना शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले.मलकापूर नगरातील नळगंगा नदीच्या किनाऱ्यावर एक नंबर पोलीस चौकी जवळील पौराणिक इतिहासाचा वारसा असलेला वैभवशाली हनुमान वेश रचने मध्ये इतिहासिक वस्तू संगोपना खाली शासनाद्वारे दिलेल्या कॉन्टॅक्ट दाराने बदल करून वेशीवर मजिदी सारखे स्वरूप देउन मिनार बनविल्या आहे हे सरळ इतिहासकालीन पुरातत्त्व सरोवर मिटविन्याचे षडयंत्र व शासनाने निर्धारित नियमावलीचे उल्लंघन आहे याबात सर्व वर्तमान पत्र यांनी शासनाच्या लक्षात आणून दिल्यावरही प्रशासनाने डोळे झाकलेले दिसत आहे तसेच प्रकार किल्ला चौक मध्ये नगरपालिका शाळेजवळ असे प्रकार सुरु आहे.तसेच मलकापूर शहरामध्ये मागील वर्षापासून गोवंश तस्करी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे , गोवंश गोवंश मालकांच्या धुऱ्याहून रात्री चोरीला जात आहे यामुळे गौधन पालक यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या संदर्भात अगोदरही विश्व हिंदू परिषद बजरंग दल व्दारे पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन सूचित करण्यात आले होते व गौतस्करी थांबवण्या करिता गो स्कोड ची मागणी करण्यात आलेली होती पण ती ही अजून मान्य झाले नाही.महाराष्ट्र शासनाने 2005 मध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे तरीही शहरात अवैधरीत्याने कत्तलखाने सुरू आहे त्यांचे तपास घ्यावे व शासनाद्वारे नियमित झालेल्या वंश हत्या बंदी कयद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना योग्य धडा शिकवावा पुरातत्व विभागात नोद असलेल्या हनुमान वेशित बदल करणाऱ्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टदार विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलद्वारे मलकापूर व्दारे मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती, जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा ,पोलीस निरीक्षक मलकापूर शहर यांना प्रतीलिपी ने केलें आहे.अन्यथा लोकशाही मार्गाने बजरंग दल तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही करण्यात आला निवेदन देण्याकरता विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे पदाधिकारी उपस्थित होते
मलकापूर शहरांमधील पुरातत्व विभागा मध्ये नोद असलेल्या ऐतिहासिक धरोहर मध्ये बदल पूर्ववत करावे अवैध गो तस्कर विरुद्ध कार्यवाही गोवंश हत्या कायद्याची अंमलबजावणी करावे - विहिप बजरंगदल ची मागणी...
Hanuman Sena News
0
Post a Comment