Hanuman Sena News

शाळांमध्ये गुरू गोविन्दसिंगजी यांच्या परिवार बलिदानाच्या सन्मानार्थ बलिदान सप्ताह साजरे करावे - वि.ही.प ची मागणी...


मलकापूर - आपला धर्म सोडून इतर धर्म स्विकारन्यासाठी मुघलांनी  गुरुगोविंदसिंहजी यांचे पुत्र यांना अतोनात त्रास दिला मात्र त्यांनी मृत्यु स्वीकारले पण आपला धर्म सोडला नाही. अश्या या वीरांच्या स्मरणार्थ बुलढाणा जिल्हा मधील सर्व शाळेमध्ये गुरु गोविंद सिंह यांच्या  परिवाराच्या या बलिदान करिता  बलीदान सप्ताह म्हणून आयोजीत करणे बाबत आज उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर यांद्वारे जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा यांना एक निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल मलकापूर द्वारे देण्यात आले.उपरोक्त निवेदन मध्ये नमूद करण्यात आले आहे की आपल्या भारत देशाच्या उज्वल व प्रगल्भ इतिहासा मधील शिख धर्म गुरू  गोविंदसिंह यांच्या परिवाराने देश व धर्माकरीता चारशे वर्षापूर्वी २१ ते २७ डिसेंबर च्या दरम्यान धर्म करिता आपल्या प्राणांचे बलीदान देवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला होता व त्यांच्या पावन बलिदानाला स्मरुन आपल्या देशातील संपुर्ण शाळेमध्ये सदरहू बलिदानाच्या सन्मानार्थ आठवण म्हणून दिनांक २१/१२/२०२४ ते २७/१२/२०२४ या कालावधी मध्ये बलिदान सप्ताह म्हणून आयोजीत करण्याकरीता योग्य ते दिशा निर्देश आपल्या स्तरावरुन बुलढाणा जिल्हयातील संपूर्ण शासकिय व खाजगी शाळांना देणे आवश्यक आहे. करीता सदरहू निवेदन आपल्या दिले आहे.त्याच प्रमाणे खिश्चन धर्मियांच्या खिश्चन सना निमित्त काही खाजगी शाळांमध्ये 1 ते वर्ग ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या निमित्त वेगवेगळ्या वेशभूषा करायला लावुन सदरहू आयोजनात हिंदी चित्रपटामधील काही अश्लील गाण्यांवर नृत्याचे कार्यक्रम ठेवून त्याव्दारे हिंदू संस्कृतीचे विभत्सीकरण करण्यात येत आहे, याबाबत बऱ्याच पालकांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे सदरहु सक्तीचे आयोजन हे थांबविणे बाबत देखील आपले स्तरावरुन योग्य ते दिशानिर्देशन सर्व शासकिय व खाजगी शाळांना देणे आवश्यक आहे करीता सदरहू निवेदन आपल्या सेवेशी देण्यात येत आहे. तरी त्या प्रमाणे योग्य ते दिशा निर्देश सर्व शासकिय व खाजगी शाळांना देणे बाबत आपल्या स्तरावरुन कार्यवाही आदेश देण्यात यावे हि विनंती. सकल हिंदु समाज्याच्या वतीने करन्यात आली निवेदनाच्या प्रतीलीपी मा.शिक्षणाधिकारी माध्य, जिल्हा परिषद, बुलढाना,मा. शिक्षणाधिकारी प्राथ, जिल्हा परिषद, बुलढाणा ,सर्व मुख्याध्यापक, बुलढाणा जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना ठेवन्यात आले आहे निवेदन देण्या प्रसंगी रा.स्व.स,साहेब कदमसर गुरुद्वारा सेवा समिती, सिंधी समाज कार्यकारणी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, प्रतिष्ठान चे कार्यकर्ता यावेळेस उपस्थित

Post a Comment

Previous Post Next Post