मलकापूर - बुद्धासारखे होते ज्ञान...
देऊन गेले संविधान...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला. त्यांचा जन्म मध्यप्रदेश मधील महू गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडीलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हुशार व महत्वाकांक्षी होते. ते भारतीय न्यायशास्त्रतज्ञ, राजकरण त्वज्ञ आणि समाजसुधारक होते.बाबासाहेब त्यांच्या शालेय जीवनात १८ तास अभ्यास करायचे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होत."शिका, संघटित व्हा, संघर्ष 'करा"हा मूलमंत्र त्यांनी दिला. स्त्री हकांसाठी ते लढले त्या काळी समाजात अस्पृश्यता, जातीभेद खूप मोठ्या प्रमाणात होता. त्याविरुद्ध त्यांनी चळवळ उभी केली! दलित लोकांनाही समान वागणूक मिळावी यासाठी लढा दिला. त्यांना 'भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या महान व्यक्तीचा महारिनिर्वाण दिन ६डिसेंबर (१९५६) रोजी साजरा केला जातो त्या निमित्त आज विश्व हिंदू परिषद सामजिक समरसता विभागा द्वारे मलकापूर रेल्वे स्थानका निकट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा सामाजिक समरसता सहप्रमुख दीपक चवरे,विधी प्रमूख ॲड.प्रशांत कुलकर्णी प्रखंड सहमंत्री रतनसिंह बोराडे, सत्संग प्रमूख श्यामसिंह भल्ला तसेच राम खेळकर आदी उपस्थित होते .
Post a Comment