मलकापूर : आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर येथे 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 14 दिवस रात्र दिवस मेहनत करून संविधान लिहले. या निमित्त संविधान दिन म्हणून आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मैदानावरती आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विजय चव्हाण सर तसेच ज्येष्ठ शिक्षक घोटी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.नंतर संविधानाची शपथ घेण्यात आली.तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मा. श्री. पढार सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.
आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर येथे संविधान दिवस साजरा...
Hanuman Sena News
0
Post a Comment