Hanuman Sena News

कृउबासचे सभापती शिवचंद्र तायडे यांचे बंधू श्रीधर तायडे गुरूजी व त्यांच्या सुविद्य पत्नीचा भाजपात प्रवेश...

मलकापूरः मलकापूर कृउबासचे सभापती शिवचंद्र तायडे यांचे बंधू श्रीधर तायडे गुरुजी व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना श्रीधर तायडे यांनी ३ नोव्हेंबर रोजी वरखेड येथे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. वरखेड येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक श्रीधर तेजराव तायडे व त्यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई श्रीधर तायडे यांनी गावाचा विकास व्हावा याकरीता भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. विकास हा माजी आमदार चैनसुख संचेती हेच करू शकतात. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेत माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला यावेळी भाजपा नेत्या श्रीमती शिलाताई संबारे, बाजार समितीचे संचालक ज्ञानदेवभाऊ वाघोदे, साहेबराव पाटील, संजयभाऊ काजळे, सौ. रंजनाताई बोरसे, राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ साठे, रिपाइंचे भाऊसाहेब सरदार, थिरतसिंह राजपूत, शैलेंद्रसिंह राजपूतसर, बाळाभाऊ तडके, सुधाकर तायडे, रामेश्वर तायडे, सुनिलसिंह राजपूत, बिरबलसिंह राजपूत, अनिल होनाळे, अजाबराव वानखेडे, सुभाष वानखेडे, अंबादास वानखेडे, बंडूसिंह खामरे, मंगलसिंह खामरे, कावड यात्रा उत्सव समितीचे सर्व युवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post