नांदुरा :कार्तिक मासानिमित्त निमगाव येथे सुरू झालेल्या सर्व मंदिरांच्या काकडा आरतीतील जवळपास २०० टाळकऱ्यांना तसेच निमगाव येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांना श्री सुपो महाराज मंदिर संस्थान निमगाव येथे निमगाव अलमपूर जिल्हा परिषद सर्कलचे भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदुत्वाचे प्रतीक असलेले भगवे शेला-टोपी व सर्व वारकऱ्यांना केशरयुक्त दुधाचे वितरण करण्यात आले.यावेळी भाजपा नेते शिवाजीराव पाटील, विनोदबाप्पू देशमुख, निमगाव सरपंच विकास इंगळे, सुभाषराव चोपडे, पुंजाजी पाटील, अनंत वावगे, प्रमोद अवचार, ग्रामपंचायत सदस्य कैलास चरखे, विनोद भोपळे, बाबुराव शिवलकर, संतोष इंगळे, सारंग इंगळे, बाळू दांडगे, मारोती ठाकरे, तुकाराम दळवी, बाळकृष्ण बोरे, शालिग्राम दांडगे, सुखदेवराव कवळकर, अनंता सपकाळ, संतोष तेल्हरकर, सुपडा दांडगे, श्रीकृष्ण काळे, लवकुमार वेरूळकर, दिनेश मुकुंद, विश्वनाथ बाठे, आनंदा वरखेडे, यांचेसह बहुसंख्य मान्यवर परिश्रम घेत होते. यावेळी उपस्थित सर्व वारकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले.
भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून टाळकऱ्यांना शेला- टोपी वाटप...
Hanuman Sena News
0
Post a Comment