मलकापूर :दि. ११ ऑक्टोबर रोजी बुलधणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण १००इ भरले त्यामुळे धरणाचे ३ दरवाजे उघडण्यात आले पण त्यामुळे नदीला प्रचंड पूर येऊन नदीकाठच्या गावातील घरांचे व शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले. त्या नुकसान ग्रस्त लोकांच्या घरांचा व शेतीचा तात्काळ सर्वे करून त्यांना शासनाकडून सानुग्रह मदत देण्यात यावी व बाधितांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी मा आ चैनसुख संचेती यांनी पत्राद्वारे राज्याचे उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली. ह्याबाबत सविस्तर वृत्त असे की, ११ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या मध्यरात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोताळा तालुक्यातील धरण ओव्हरफ्लो झाले त्यामुळे नळगंगा धरणाचे दरवाजे २ ते ३ फुटापर्यंत उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.त्यामुळे नळगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली व नदीला प्रचंड पूर आला त्या अचानक आलेल्या पुरामुळे दाताळा, शिराढोण, मोरखेड व मलकापूर शहरातील ज्ञानेश्वर नगर, गाडेगाव नगर, माता महाकाली नगर, भीम नगर, मंगलगेट, बारादारी दुर्गा नगर, सालीपुरा, मोहनपुरा, पारपेठ व शिवाजीनगर येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले पण अचानक आलेल्या पुरामुळे ह्या भागातील अनेकांची घरे वाहून गेली अनेकांच्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.तसेच अनेकांच्या घरातील वस्तू पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेल्या. परिस्थिती इतकी भीषण होती की, पूरग्रस्त लोकांच्या एक वेळच्या जेवणाची देखील सोय राहिली नाही त्याच प्रमाणे अनेक शेतकरी वर्गास ह्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. घडलेल्या नैसर्गिक आपत्ती चे गांभीर्य लक्षात घेऊन मा आ चैनसुख संचेती यांनी तहसीलदार श्री राहुल तायडे व महसूल च्या अधिकारी वर्गाला सोबत घेत पूरग्रस्त भागात स्वतः नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.व पुरबाधितांची पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेस तात्काळ सर्वे करण्याचे निर्गमित केले व राज्याचे उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना बाधित कुटुंबाना तात्काळ सानुग्रह निधी देण्यात यावा तसेच नुकसानग्रस्त ग्रामस्थांचे व पडझड झालेल्या घरांच्या कुटुंबीयांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे त्याकरिता जिल्हाधिकारी यांना तसे तात्काळ आदेश निर्गमित करून शासनाला अहवाल कळविण्यात यावा अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे.
पूरग्रस्त बाधितांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे तसेच तातडीने त्याचे पुनर्वसन करण्यात यावे - मा.आ. चैनसुख संचेती
Hanuman Sena News
0
Post a Comment