मलकापुर :दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी नगर सेवा समिती संचलित ली. भो. चांडक विद्यालयातील पर्यवेक्षक श्री. अरुणसिंह राजपूत यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी नगर सेवा समितीचे अध्यक्ष मा.भाऊसाहेब डोरले, कार्यवाह तथा नगर संघचालक मा.दामोदरदासजी लखाणी, मा. माधवरावजी गावंडे, तसेच विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर आणि सत्कारमूर्ती श्री. अरुणसिंह राजपूत मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर नगर सेवा समिती आणि विद्यालयातर्फे तसेच आदर्श शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे अरुणसिंह राजपूत यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.शाळेतील शिक्षकवृंदातर्फे श्री. निवृत्ती निंबोळे सरांनी अरुणसिंह राजपूत यांच्या शालेय जीवनातील आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी राजपूत यांच्या शैक्षणिक सेवेत केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.सत्काराला उत्तर देताना श्री. अरुणसिंह राजपूत यांनी शाळेतल्या आपल्या 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील आठवणी जागवल्या. त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना एकजिन्सिपणा राखून शाळेचे वैभव पुनःप्राप्त करण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात मा. भाऊसाहेब डोरले यांनी अरुणसिंह राजपूत यांच्या शैक्षणिक आणि संघ कार्यकर्ते म्हणून केलेल्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी अरुणसिंह यांनी संघकार्याची नाड कायम ठेवावी असे भावनिक आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. नितीन चव्हाण यांनी केले.
चांडक विद्यालयात अरुणसिंह राजपूत यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment