Hanuman Sena News

विघ्नहर्ता सार्वजनिक भुलाबाई उत्सव नांदुरा खुर्द मध्ये सलग तिसऱ्या वर्षी मोठ्या हर्ष उल्हासात साजरा...

नांदुरा: महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकरीवर्गासह सर्वजण येथे निरनिराळे खेळ व उत्सव साजरे करतात यांपैकी महत्वाचा एक उत्सव म्हणजेच भुलाबाई उत्सव. भुलाबाई म्हणजेच शीव आणि शक्तीची पूजा हा सण विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दख्खन, खान्देश यार सर्व प्रांतामध्ये कृषी संस्कृतीची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात. सर्व भागात शेतातलीत शेतमाल हा कापणी - काढणीला आला की त्याचा आनंद हा शेतकरी आपल्या रूढी आणि परंपरेच्या रूपाने साजरा करतात.भुलाबाई म्हणजेच शक्तीरूप पार्वती ही अन्नाची देवता मानली जाते. त्याप्रमाणेच भुलाबाई हा उत्सव नवीन आलेल्या पिकाच्या, धान्याच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. हा सण स्त्रियांचा व मुलींचा असतो त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी गाणी म्हटली जातात. या उत्सवामुळे स्त्रिया व मुली एकत्र येतात आणि भुलाबाई हा सण साजरा करतात.गुरुवार  दि. १७/१०/२०२४ रोजी विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळ नांदुरा खुर्द द्वारा संचलित विघ्नहर्ता भुलाबाई उत्सव मंडळाच्या वतीने भुलाबाई हा उत्सव सरिता ताई बावस्कार यांच्या मार्गदर्शनात सलग तिसऱ्या वर्षी मोठ्या हर्ष-उल्हासात साजरा करण्यात आला. मंडळामध्ये भुलाबाईला ज्वारीच्या धांड्यांनी बनविलेल्या खोपडीमध्ये सजावट करून बसविण्यात आल्या. महिला व मुली एकत्र येऊन भुलाबाईची गाणी म्हंटली. यानंतर आरती करून सर्वांना खिरापत वाटण्यात आले. दसऱ्या पासुन पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला गेला. काळानुसार ही प्रथा कमी होत चालली आहे. पूर्वी एक महिना साजरा होणारा हा उत्सव ११, ५, ३, १ एवढे दिवस साजरा करण्यात येतो. त्यासोबतच या उत्सवाचा गोडवा पण कमी होत चालला आहे.परंतु पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याचे धन म्हणजेच शेतीचा माल हा घरात येतो. म्हणून प्रत्येकघरात हा उत्सव साजरा करुन अन्नपूर्नेचा सन्मान नक्की करावा.सर्वांनी या सणाचे महत्व जाणून घ्यावे. आपल्या लोककला जपण्यासाठी विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळ संचलित विघ्नहर्ता सार्वजनिक भुलाबाई उत्सव मंडळ च्या वतीने उपस्थित सर्व महिलांना व मुलींना हे आवाहन करण्यात आले. यावेळी सौ. सरिता प्रकाश बावस्कार विघ्नहर्ता सार्वजनिक भुलाबाई उत्सव मंडळ - अध्यक्षा तसेच कमलबाई नारखेडे, नलिनी नारखेडे, पुष्‍पा बऱ्हाटे, प्रिती खैरे, लीला डिवरे, माया बडवे, उषा बावस्कार,वनिता सातव समवेत शे - दोनशे मुली उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post