मलकापूर:- विघ्नहर्ता श्री गणरायाचे आज आगमन होत असून यंदाही लाडक्या बाप्पाच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. घरगुती उत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजविलेल्या दरबारात बाप्पा आज विराजमान होणार आहे .त्या अनुषंगाने बाजारात श्रींच्या मुर्त्या आणि पूजेच्या साहित्याची मागणी वाढली आहे. बाप्पाच्या स्थापनेसाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे चित्र शहरात ठीक ठिकाणी दिसून येत आहे. गणेश उत्सव, गौरींमुळे बाजारातील रोनक काही दिवसापासून वाढली आहे. पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात भाविकांची गर्दी दिसून आली. गतकाही वर्षापासून पर्यावरण प्रेमींकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सवावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने माती, शाडू माती आणि पर्यावरण पूरक सामग्री पासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली जात आहे. मलकापूर तालुक्यात 140 मंडळांची नोंद केली असून श्री गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे एकूण आकडा वाढण्याची शक्यता आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाची सुरुवात शनिवारी होत आहे सार्वजनिक गणेश मंडळाची तयारी झाली आहे. तर घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी आबालवृद्ध सज्ज आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 75 एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत 50 तर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत 15 अशा एकूण 140 गणेश मंडळांनी गणपती उत्सवासाठी परवानगी घेतल्या आहेत.
लाडक्या बाप्पाचे आज जल्लोषात आगमन...
Hanuman Sena News
0
Post a Comment