Hanuman Sena News

शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहर तर्फे नर्मदाताई घोपे यांचा सत्कार...






नांदुरा: आजच्या काळात स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आपले कर्तृत्व बजावत आहे. नांदुरा शहरात  स्त्रियांची कामगिरी , स्त्रियांचा सामाजिक क्षेत्रातील अग्रेसरपणा खरोखरच  स्तुत्यजन्य आहे  असाच एक नांदुरा शहरातील महिला म्हणजेच सौ.नर्मदाताई घोपे. नर्मदाताई घोपे यांची स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना शासन मान्य, नांदुरा तालुका महिला अध्यक्षा या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना महिला आघाडी तर्फे त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यासोबतच ताईच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सरिता बावस्कार उपशहर प्रमुख सौ प्रज्ञा तांदळे, सचिव सौ. भावनाताई सोनटक्के इतर  महिला व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post