मलकापूर प्रतिनिधी,
नागेश सुरंगे
मलकापूर: दि 30 ऑगस्ट रोजी दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शासना तर्फे दिव्यांगाना दरवर्षी दिल्या जाणार्या ५ % निधीच्या वाटप करण्या बाबत निवेदन देण्यात आले होते .परंतु ८ दिवस होऊनही निधी वाटप न झाल्याने संस्थेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी मलकापूर नगर परिषद येथे भिक मांगो आंदोलन केले सविस्तर वृ्तांत मलकापूर नगर पालिका याचे कडून दिव्यांगाचां पाच टकके निधी मिळवण्या साठी दर वर्षी अनेक निवेदन, आंदोलन, मोर्चे , ठीया आंदोलन अश्या विविध माध्यमातून दीव्यांग आपल्या हक्काच्या निधी साठी लढा देत आले आहे परंतु मलकापूर नगर परिषद मुख्यधिकारी याचे कडून दर वेळी निधी वेळेवर मिळत नाही या करिता आज भिक मांगो आंदोलन काढून दीव्यांग मजूर नागरिकांनी त्यांच्या रोष व्यक्त केला परंतु आज न प मुख्यधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या कार्यक्रमात बुलढाणा गेले असल्याने दिव्यांग नागरिकांना दिव्यांग निधी बाबत चर्चा करता आली नाही तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरपालिका अधिकारी कडून अशी माहिती मिळाली की यावर्षीपासून दिव्यांगाना निधीचा वाटप त्यांच्या टक्केवारीनुसार करण्यात येईल असा जिल्हाधिकारी यांचा निर्णय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर दिव्यांग संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या निधीबद्दल व नवीन नियम टक्केवारी बद्दल विचारणा करावी अशी समज देत सध्या तरी नगरपालिका पदाधिकारी यांनी हात झटकले आहे.त्यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नागेश सुरंगे, महाराष्ट्र राज्य सहसचिव पंकज पाटील, राजू रोडे ,अशोक पवार,दिगंबर बोरले,अमर सालवानी,रवींद्र जंगले,अनिल गोठी, एकनाथ जाधव,निखिल पौंदे,सरिता भोई शुभांगी डवले,इतर कार्यकर्ते उपस्थित होते.दिव्यांग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष नागेश सुरंगे यांनी दिव्यांगाचे निधी सर्वाँना सारखे मिळावे नवीन नियमा प्रमाणे टक्केवारीनुसार निधी वाटप झाला तर अनेक दिव्यांगांना उपाशी पोटी झोपावं लागेल अगोदरच अपंग असल्यामुळे त्यांना काम धंदा किंवा मजुरीचे काम करता येत नाही त्यामुळे सर्व दिव्यांगांना या अगोदर ज्या नियमाप्रमाणे निधी वाटप होत होता त्याच नियमाचा पालन व्हावा अशा प्रकारची धोषणा करीत लवकरच या विषयावर बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरच भेट घेऊ असे विचार व्यक्त केले आहे
Post a Comment