Hanuman Sena News

खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा! भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान...


बुलढाणा : "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे घोषवाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी वर्दी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात. कधी-कधी पोलिसांना खाकी दाखवावी लागतेच, मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकित एक वडीलाचं प्रेम व एक आईची 'ममता' लपलेली असते. याचा प्रत्यय बुलढाण्यातून समोर आलाय.एक दिवसाच्या भुकेल्या अनोळख्या चिमुकलीला बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात  कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपलं स्वतःचा दूध पाजून त्या चिमुकलीला शांत केलं. तिची भूक भागवत चिमुकलीचा जीवदान देखील दिलंय. या महिला कर्मचाऱ्याने केलेल्या या कार्यामुळे त्यांचे कौतुक तर होतच आहे. मात्र या प्रकारामुळे खाकीमधली 'ममता' देखील सर्वांसमोर आलीये. योगिता शिवाजी डुकरे असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, लोणार येथून एका इसमाने एका दिवसाच्या चिमुकलीला दुचाकीवरून 100 किमी प्रवास करत बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणले होते.परंतु अनाथ आश्रमाने पोलिसांत तक्रार नोंदवण्यास सांगितले. हा इसम चिमुकलीला घेऊन त्याच दिवशी रात्रीच्या सात ते आठ वाजेच्या वेळी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहचला होता. ही चिमुकली एका वेडसर महिलेची असून तिने या चिमुकलीला बेवारस सोडून निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.त्यामुळे चिमुकलीला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचे या इसमाने पोलिसांसमोर कथन केले. सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इसमाकडे असल्याने ती उपाशी होती. याच कारणाने ती व्याकुळ होऊन रडत होती. यावेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच त्यांच्यामधील 'ममता' जागृत झाली.त्यांना कळलं की, ही चिमुकली उपाशी आहे. त्यांनी लगेच परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं. विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचे लक्षात आलं.सध्या या चिमुकलीवर बुलढाण्याच्या सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post