Hanuman Sena News

वरखेड येथे हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम सीता माता, व लक्ष्मण यांच्या मूर्तीची विटंबना...


 

मलकापूर: तालुक्यातील वरखेड येथे अज्ञात समाज कंटकाकडून गावातील मधोमद असलेले प्राचीन श्रीराम मंदिर येथिल स्थापित श्रीराम,सीता,लक्ष्मण यांच्या तिन मुर्त्या या तीनही  मुर्त्या खंडित करून विटंबना केली सदर घटना 28 सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरखेड गावातील श्रीराम मंदिर असून पूजा आरती होत असते. दररोजच्या प्रमाणे  गावातील ज्येष्ठ महिला कोकीळाबाई महादेवराव तायडे वय 65 वर्ष, ह्या श्रीराम मंदिरात साफसफाई करण्याकरिता गेले असता त्यांना श्रीराम,लक्ष्मण, सीता यांच्या तोंडावर, नाकावर,गालावर,कशाने तरी ठेचून तोडण्याचे दिसले.व श्री रामाच्या  उजव्या हाताचे बोट तोडल्याचे दिसले,त्यामुळे कोकिळाबाई तायडे यांनी विनोद तायडे यांना बोलून सदर घटनेची माहिती सांगितली.त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.वरखेड येथे प्राचीन श्रीराम मंदिर असून या मंदिरामध्ये रोज नित्य पूजा आरती होत असते. गावातील लहान मुले, महिला, पुरुष,थोरमंडळी असे सर्वजण मोठ्या भक्ती भावाने रोज पूजा आरती होत असते.श्रीराम मंदिरातील श्रीराम सीता लक्ष्मण या तिन्ही मूर्त्या खंडित झालेले आहे.असे लक्षात तेव्हा गावात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी घटनास्थळी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्यासह पोलीस कॉ.संदीप राखोंडे,पो.कॉ.सचिन दासर,पो. कॉ.भगवान सुरळकर हे वरखेड येथे दाखल झाले.तसेच गावामध्ये अंगुली मुद्रा पथक, व श्वानपथक सुद्धा पाचारन करण्यात आले.सध्या वरखेड येथे शांतता आहे.अक्षय अनिल तायडे वय 28 राहणार वरखेड यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध  भारतीय न्याय संहिता 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.हिंदूंचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम यांच्या मंदिरातील श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मुर्त्या समाजकंटकांनी खंडित करून विटंबना केली.त्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.या घटनेचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल तीव्र निषेध व्यक्त करत आहे.तसेच या अज्ञात  समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. जेणेकरून असे धाडस पुन्हा कोणी करणार नाही.असे विश्व हिंदू परिषदेचे मोहन सिंह राजपूत मलकापूर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post