नांदुरा :- आज आपला भारत देश हा विकासनशील देश आहे. देशाच्या प्रगती साठी स्त्री सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. पालकवर्ग आपल्या पाल्यांना उच्च व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी उत्तमोत्तम शाळेमध्ये दाखला देऊन अथक परिश्रम करताना आपणास दिसतात. मात्र आपल्या देशात,आपल्या राज्यात, जिल्ह्यात घडणाऱ्या गोष्टींवरून सर्वांची चिंता वाढली आहे.आपल्या पाल्याला अनोळखी व्यक्तीसोबत किंवा काही ओळखीच्या व्यक्तींसोबत देखील पाठवताना पालक विचार, संकोच व्यक्त करतात. मुलांचे आजी, आजोबा, काका, मामा, काकू मामी, नातेवाईक मुलांना प्रेमाने जवळ घेऊन कुरवाळत असतात. परंतु अनोळखी व्यक्ती मुलांसोबत अशे वागू शकत नाही. परंतु याबाबत मुलांना ज्ञान नसते.आजच्या या लैगिक अत्याचारांच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांना / मुला - मुलींना या सर्व घटनांच्या बाबतीत जागरूक राहता यावे. आपल्यावर येणारे संकट कश्याप्रकारे टाळावे व कोणत्या परिस्थितीमधे काय निर्णय घ्यावा याकरिता विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच चे ज्ञान देऊन सतर्क करण्यासाठी सोमवार दि ०२/०९/२०२४ रोजी अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथे गुड टच आणि बॅड टचचे सत्र घेण्यात आले.मिसेस सुधा सिंग गौर यांच्याकडुन हे सत्र घेण्यात आले. सदर सत्रामध्ये विध्यार्थ्यांना स्पर्श कशाप्रकारचे असतात त्याबद्दल माहिती देण्यात आली. गुड टच आणि बॅड टच यांमधील फरक विस्तारित स्वरूपात समजविण्यात आला.एखाद्या व्यक्तीने वाईट हेतूने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यास कश्याप्रकारे प्रतिउत्तर द्यावे, कसा विरोध करावा आणि एखाद्या व्यक्तीने काही खायला दिले असल्यास ती खायची वस्तू घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात याचे प्रात्यक्षिक करून लक्षात आणून दिले. संपूर्ण सेशन हे विद्यार्थ्यांना सहज समजावे यासाठी बाहुला - बाहुली यांच्या उपयोगाने सम्पूर्ण सेशन समजाऊन सांगण्यात आले. आपले पालक, शिक्षक यांसोबत आपल्याला चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टी शेअर करण्याचे फायदे सांगितले. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने व जाणीवपूर्वक संपूर्ण सत्र समजवून घेतले. गुड टच बॅड टच मधील फरक ओळखला आणि यानंतर सतर्कतेने आणि प्रसंगावधान राखून हालचाल / संकटावर मात करण्याचे आश्वासन दिले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सरिता बावस्कार यांनी पालक व पाल्य यांतील चर्चा व संवाद नियमित सुरु ठेवण्याचे आवाहन केले. सदर सत्राच्या वेळी विद्यार्थी,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथे पार पडले गुड टच बॅड टच चे सत्र..
Hanuman Sena News
0
Post a Comment