Hanuman Sena News

लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाचे तीन खेळाडू विभागीय स्तरावर...



 मलकापूर:- दिनांक 30 ऑगस्ट रोजी तालुका क्रीडा अधिकारी श्री ओजस धारपवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली  लीलाधर भोजराज चांडक विद्यालय येथे बुलढाणा जिल्हास्तरीय वेतलिफ्टिंग 2024-25 स्पर्धेचे आयोजन झाले या स्पर्धेचे उद्घाटन श्री वीरसिंग दादा राजपूत तर चांडक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.श्री  जयंत राजूरकर सर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत साळुंखे सर श्री प्रा.धीरज जी वैष्णव  प्रा. डॉ श्री. नितीन भुजबळ  मलकापूर तालुका क्रीडा संयोजक श्री दिनेश राठोड सर होते. 17 वर्षाखालील 19 वर्षाखालील तब्बल 76 स्पर्धक मुले मुली सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेत चांडक विद्यालयच्या तीन खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी करत आपले नाव विभागीय स्पर्धेसाठी नोंदवले सर्व यशस्वी खेळाडूंना संस्था संचालक मंडळ,शाळेतील  मुख्याध्यापक शिक्षक संघ व इतरेत्तर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत उंबरकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संदीप वैष्णव सर यांनी केले या जिल्हास्तरीय स्पर्धा यशस्वी करण्या साठी पंच म्हणून श्री रामा मेहसरे, थटार सर जुमडे सर, वराडे सर नवले सर आकाश शिरकरे,विनय पाटील, राहुल बगाडे, , विकास सोखंडे यांनी काम पहिले तर लोडर म्हणून अंश श्रीवास विनायक अत्तरकार प्रणव गीते  मयूर ठोसर यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post