मलकापूर, दि. 10 ऑगस्ट 2024:नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर येथे पुणे नऱ्हे रस्ता येथील श्री. प्रभाकर शंकर धाक्रस यांनी आपल्या आई - वडिलांच्या स्मृती निमित्त संस्थेला एक लाख रुपयांची मोठी देणगी दिली. त्यांच्या या उदार देणगीमुळे शाळेतील इयत्ता 5 ते 12 मधील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यासाठी मदत होणार आहे. श्री. धाक्रस यांनी ही रक्कम कायमस्वरूपी ठेव म्हणून ठेवावी, आणि त्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात यावीत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.या प्रसंगी संस्थेचे वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मा. संचालक संजयजी चांडक,डॉ. प्रा.जयंत राजूरकर,ता. संघचालक मा. ज्ञानदेव पाटील, आणि एस. व्ही. धाक्रस, एस. पी. नेने उपस्थित होते.श्री. धाक्रस यांनी दिलेली ही देणगी संस्थेच्या वतीने श्री. संजयजी चांडक यांनी स्विकारली.श्री. प्रभाकर धाक्रस हे जीवनभर स्वयंसेवक म्हणून समाजसेवेत कार्यरत राहिले आहेत. मलकापुरातील किल्ला शाखेचे ते जुने स्वयंसेवक आहेत. मलकापूरशी असलेले माझे नाते पुन्हा घट्ट व्हावे, यासाठी त्यांनी विद्यालयाला ही देणगी दिली.ह्या पूर्वी सुद्धा त्यांनी शाळेला मोठी देणगी दिली आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश दिला गेला आहे. त्यांच्या उदारतेने समाजातील इतरांना प्रेरणा मिळेल, अशी खात्री विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली आहे.शाळेचे मुख्याध्यापक डॉ. प्रा. जयंत राजूरकर यांनी श्री. धाक्रस यांच्या देणगीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, त्यांच्या सामाजिक ऋणातून उत्तराई होण्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे. यासोबतच भविष्यातही श्री. धाक्रस यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी श्री. धाक्रस यांची मदतीची सावली: चांडक विद्यालयाला मोठी देणगी...
Hanuman Sena News
0
Post a Comment