मलकापूर:दि. 2 ऑगस्ट 2024 स्थानीय नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षिका सौ. छाया गणेश बांगर यांनी शाळेला सेवानिवृत्ती नंतरही आपली नाळ कायम ठेवत शाळेला 40,000/- रुपये देणगी म्हणून दिले आहेत. सौ.बांगर मॅडम यांनी शाळेत अनेक वर्षे अध्यापन करीत होत्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या उदार कृतीमुळे शाळेच्या सर्व शिक्षक, आणि पालकांनी त्यांचे आभार मानले आहेत.सदर देणगीचा चेक प्राचार्य . डॉ. जयंत राजूरकर यांनी स्वीकारला. सौ. बांगर यांनी या रकमेचा उपयोग शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या हितार्थ करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी श्री. गणेश बांगर, पर्यवेक्षिका सौ. विद्या काळबांडे, पर्यवेक्षक श्री. अरुणसिंग राजपूत आणि शाळेचा स्टाफ उपस्थित होता. प्रा. राजूरकर यांनी सौ. बांगर यांचा गुच्छ देऊन या प्रसंगी यथोचित सत्कार केला व त्यांचे आभार मानले.
सेवानिवृत्तीनंतर सौ. छायाताई बांगर यांचे शाळेसाठी समर्पण...
Hanuman Sena News
0
Post a Comment