Hanuman Sena News

गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह संपन्न...




मलकापूर: दि. 19 जुलै 2024
नगर सेवा समिती द्वारा संचालीत ली.भो. चांडक विद्यालयात 19 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हया प्रसंगी इयत्ता 10 मधून 90%पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता 12 कला, वाणिज्य, आणि विज्ञान विभागातून प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विदयार्थ्यांचा सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोरले तर गट शिक्षणाधिकारी श्री जे. एन. फाळके यांची प्रमुख उपस्थिती होती व सुगंनचंदजी भंसाली, माधवराजी गावंडे, संजयजी चांडक, तालुका संघचालक श्री ज्ञानदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी म्हणून श्री फाळके यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच हया प्रसंगी  चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या माजी विद्यार्थी सी.ए.कु. प्राजक्ता प्रदीप मोरे, सी.ए. जतीन सुनील अग्रवाल, सी.ए.अनिरुद्ध चवरे,सी.ए. दिग्विजय प्रवीण जैन या माजी  विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाने  न्युझीलँड येथे पार पडलेल्या ज्यु . कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेमध्ये  कु. गौरी मंगलसिंग सोळंके हिला रौप्य पदक प्राप्त झाल्याबद्दल तीचे वडील सहा. शिक्षक मंगलसिंह सोळंके यांचा सत्कार करण्यात आला. तर सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रा. संजय शिंदे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे मध्ये विषय समिती सदस्य म्हणून निवड झाल्या बद्दल शाळेचे शिक्षक श्री. शरद देशपांडे, पंकज शुक्ल, व विजय अंबुसकर यांचा यथोचित सत्कार या प्रसंगी करण्यात आला.हया प्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना श्री. फाळके म्हणाले, गुणवंत विद्यार्थी घडवतांना मार्गदर्शकाचा वाटा महत्वाचा आहे.चांडक विद्यालयाची माजी विद्यार्थ्यांनी कु. गौरी सोळंके हिने न्युझिलॅन्ड मधील स्पर्धेत यश संपादन करून केवळ शाळेचाच नव्हे तर देशाचाही गौरव वाढवाला आहे.विद्यार्थ्यांनी कायम संघर्ष, जिद्द व चिकाटी ठेवली तरच यश प्राप्त करता येईल. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी नुसार क्षेत्र निवडून पुढे मार्गक्रमण करावे व पालकांनी सुद्धा त्यांना त्यामध्ये मदत करावी असे आवहान या वेळी केले.तर अध्यक्षीय समारोप करतांना भाऊसाहेब डोरले यांनी विद्यार्थ्यांना जीवनात दोन सूत्र कायम लक्षात ठेवण्यासाठी सांगितले,छोट्या गोष्टींनी परिपूर्णता येते,पण परिपूर्णता ही छोटी गोष्ट नाही व दुसरे सूत्र,एक महत्वाची व्यक्ती असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु चांगली व्यक्ती असणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तेंव्हा गुणवंत विद्यार्थांनी आपल्या जीवनात आपण एक चांगला व्यक्ती म्हणून सिद्ध होऊ यासाठी प्रयत्न करावे, त्यानंतर त्यांनी सर्व गुणवंत विदयार्थांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी आभार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे संचालन श्री.मिलिंद काळे व सौ. चांडक यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post