Hanuman Sena News

"लाडकी बहीण'नंतर 'लाडका भाऊ' योजना...




मुंबई: मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देताना सांगितलं की, 'लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? असं प्रश्न काही जणांनी विचारला होता. लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे, असं मला त्यांना सांगायचं आहे. आम्ही त्यांच्यासाठी देखील योजना आणलीय. 12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील.या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप  करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेलाच 'लाडका भाऊ योजना' असं म्हंटलं जात आहे.12 वी उत्तीर्ण - दरमहा 6 हजार रुपये
डिप्लोमा झालेला तरुण - दरमहा 10 हजार रुपये
पदवीधर तरुण - दरमहा 10 हजार रुपयेलाडका भाऊ योजने'साठी पात्रता 
- या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
- या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे
- शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत
- शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
- बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल
- अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
- इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावीं

Post a Comment

Previous Post Next Post