देवेंद्र फडणवीस पक्ष संघटनेत होणार सक्रीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती जवळपास निश्चित केली असून लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले अपयश हे पाहता भाजप आता पक्ष संघटनेत तसेच सरकारमध्ये काही बदल करणार असून पावसाळी अधिवेशन संपताच राज्यामध्ये अनेक बदल झाल्याचे पहावयास मिळणार आहे. बीड लोकसभा मतदार संघातून अत्याल्प मताने पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देवून त्यांची पुनर्वसन केले खरे मात्र राज्यातील दोन समाजातील दिवसेंदिवस वाढत जाणारा असमतोल, विसंवाद हे पाहता राज्याच्या प्रमुखपदी ओबीसी चेहरा असावा जेणे करून ओबीसींना आधार वाटेल आणि हा ओबीसी समाज भाजपच्या बाजूने खंबीरपणाने विधानसभेमध्ये उभा राहीलं या दृष्टीने पक्षाची रणनिती ठरविण्यात आली असून राज्यातील ओबीसीचा आश्वासक चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना पहिली पसंती ओबीसी समाजाकडून कायम देण्यात आली असून पंकजा मुंडे यांना आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात येणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारमधून बाहेर पडून भाजप पक्ष बांधणीमध्ये ते पुर्णवेळ सक्रीय राहणार आहेत. त्यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद हे जाणार असून आगामी विधानसभा निवडणुका या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून भाजप पुर्ण करणार आहे.राज्याची आगामी राजकीय परिस्थिती पाहता मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचा आता मतदारांबर फारसा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीत पडणार नाही ही बाब भाजपच्या लक्षात आल्याने तसेच भाजपने केलेल्या वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून असलेली प्रतिमा ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सरकार खेचून आणण्यासाठी तितकीसी आश्वासक नाही. तसेच अजित पवार यांचा स्पष्टोक्तेपणा हा देखील सरकार खेचून आणण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे एक आश्वासक चेहरा तसेच जातीय समिकरणं लक्षात घेता पंकजा मुंडे यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी बसविले जेणे करून राज्यातील सबंध ओबीसी समाज हा एकगठ्ठा भाजपच्या पाठीशी उभा राहीलं तसेच याचा फायदा सहकारी पक्षांना देखील त्यांचे उमेदवार निवडून येण्याकरीता होईल. एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांची मुस्लिम समाजामध्ये देखील चांगली 'इमेज' असून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात सरकारने काम केले तर राज्यातील काही अंशी मुस्लिम समाज हा महायुतीच्या सोबत येईल अशी अपेक्षा देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठीना आहे.त्यामुळेच अधिवेशन संपताच विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दि. १४ किंवा १५ जुलै रोजी राज्यातील सरकारमध्ये अनेक बदल झालेले पहावयास मिळणार आहे.राज्यातील जातीय समिकरणे आणि विकास या दोन गोष्टी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायम चर्चेत राहणार असून ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरीता पंकजा मुंडे यांच्या समोर केवळ निवडणुकीचे आवाहन एवढेच असणार नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळणाऱ्या संधीचा कसा उपयोग करता येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी पंकजा मुंडे यांचे नाव निश्चित्त..!
Hanuman Sena News
0
Post a Comment