Hanuman Sena News

कुंड खु. येथील सरपंच सौ. वैशाली राकेश पाटील यांना मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांचे कडून सरपंच अपात्रतेबाबत मिळाला स्थगिती आदेश, गावकरी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण...


मलकापूर: याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कुंड खुर्द येथील सरपंच सौ. वैशाली राकेश पाटील यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे याबाबत प्रकरण दाखल करण्यात आले होते. उपरोक्त प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी ग्रा.प.प्र. कलम १४(१) (ज-३)/ कुंड ६६/२०२१-२२ नुसार दि.६ जुलै २०२२ रोजी सदर प्रकरणात सरपंच व सदस्य अपात्र करण्यात आलेला आदेश पारित करण्यात आला होता. याबाबत वैशाली पाटील खुर्द यांनी उपरोक्त प्रकरणी विभागीय आयुक्त अमरावती येथे अपील दाखल केले असता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली होती. व ग्रामपंचायत चा कारभार सुरळीतपणे चालू होता.परंतु सदर प्रकरणा मध्ये विभागीय आयुक्त अमरावती विभाग गजेंद्र बावणे यांनी सदर अपील क्र.५४/बीव्हीपी १६ (२)/ कुंड खुर्द जि. बुलढाणा/२०२२ यामध्ये दि.२३ एप्रिल २०२४ रोजी अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिलेला आदेश हा कायम ठेवण्यात आला असल्याचा निकाल देण्यात आला होता व त्याविरोधात सरपंच सौ. वैशाली राकेश पाटील ह्यांनी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे रिट याचिका दाखल केली असता सदर विभागीय आयुक्त अमरावती विभाग गजेंद्र बावणे यांनी दिलेल्या सरपंच अपात्रतेच्या निर्णयाला मा. न्यायधीश श्री एन.आर. बोरकर, जे. यांचे न्यायालयाने दि. २६ जून २०२४ रोजी स्थगिती आदेश दिला आहे.वरील निर्णयामुळे सौ. वैशाली राकेश पाटील ह्या कुंड खुर्द येथील सरपंच पदावर पुन्हा एकदा कायम असून गावातील जनतेची सेवा करण्याची त्यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे त्याबद्दल त्या समाधानी आहेत व वरील आदेशामुळे कुंड खुर्द येथील गावकरी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post