मलकापूर: २६ मे रोजी मलकापूर परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे समर्पण लॉन येथे अंगावर भिंत पडल्यामुळे मंगलगेट मारोती मंदिराजवळील विशाल प्रल्हाद चोपडे यांचा मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ लाख रूपये मदतीचा धानादेश मृतकाच्या कुटुंबियाला २६ जून रोजी देण्यात आला.मलकापूर परिसरात २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. दरम्यान स्थानिक समर्पण लॉन येथे शहरातील मंगलगेट परिसरातील रहिवाशी विशाल चोपडे यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत देण्यात येणारी ४ लाखाच्या मदतीचा धनादेश मृत व्यक्तीची पत्नी शिला विशाल चोपडे यांना २६ जून रोजी तहसिल कार्यालय मलकापूर येथे देण्यात आला.यावेळी एस.एस. उगले तहसिलदार, देवेंद्र कुहे निवासी नायब तहसिलदार, जी.यू. खुळे, धिरज जाधव तलाठी, ओम शांती सेवा समितीचे सचिन भंसाली, हनुमान सेनेचे अमोल टप, विरेंद्र कासे, प्रहार संघटनेचे शालीग्राम पाटील, दिलीप पाटील, बळीराम बावस्कार आदी उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मृतकाच्या कुटुंबाला मदतीच्या धनादेशाचे वितरण...
Hanuman Sena News
0
Post a Comment