जळगाव जामोद : वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे चारचाकी गाडीने जात असताना आसलगाव ते खांडवी गावादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर गोळीबार केल्याची घटना मंगळवार, दि. २५ जूनच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे गाडीने नांदुरा येथे जेवण करण्यासाठी जात होते. या दरम्यान, आसलगाव ते खांडवीदरम्यान अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हल्लेखोरांपैकी एकाने गाडीच्या काचावर रॉडने हल्ला केला तर दुसऱ्याने गोळी झाडल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर हल्लेखोर फरार झालेत. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळ गाठले व हल्लेखोरांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघेही सुरक्षित असून, त्यांना पोलिसांनी तत्काळ पोलिस स्टेशनला रवाना केले. वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला; गोळीबार झाल्याचे वृत्त...
Hanuman Sena News
0
Post a Comment