Hanuman Sena News

अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथे शैक्षणिक क्रांतीचे जनक -राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी...





नांदुरा: विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात महाराष्ट्राचे सामाजिक जीवन ढवळून काढणारी, सामाजिक समतेची प्रतिष्ठापना करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करणारी, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी तळमळणारी व मार्गदर्शन करणारी लोकोत्तर व्यक्ती म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत.. आज बुधवार दि. २६/०६/२०२४ म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.शाहू महाराज एका संस्थानाचे अधिपती असले तरी त्यांचे मन लोकशाहीवाद्यांचे होते.वागणूक समतेच्या पुरस्कांची होती. बहुजन समाजाची व विशेषतः अस्पृश्य वर्गाची अस्मिता जागृत करण्याचे, त्यांच्या सर्वांगीण उद्धाराचे कार्य त्यांनी सुरू केले व त्याद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात समता प्रस्थापित करण्याचा मौलिक प्रयत्न केला. म्हणुनच त्यांचा जन्मदिन हा ' सामाजिक न्याय दिन ' म्हणून साजरा केला जातो. या महान समाजसुधारक शाहू महाराजांची जयंती व 'सामाजिक न्याय दिन' आज बुधवार दि.२६/०६/२०२४ रोजी अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य दैवत माँ शारदा आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका कु.अश्विनी लांडे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका कु.कोमल मांडवकार यांनी केले शाळेतील विद्यार्थी चि. सुमेध विनोद कठाळे आणि रोहन परमेश्वर कांडेलकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सौ. सरिता बावस्कार यांनी विध्यर्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांचे निरनिराळ्या क्षेत्रातील योगदानावर प्रकाश  टाकून माहिती सांगितली  कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शिक्षिका सानिका तराळे यांनी केले.छत्रपती शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल कळवळा होता आणि त्यामुळेच बहुजन समाजाची स्थिती सुधारावी हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी या समाजाला साक्षर करण्याचा विडा उचलला. संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. छत्रपती शाहू महाराजांनी 'गाव तेथे शाळा' ही मोहीम उघडली.  विद्यार्थ्यांना वाचनासाठी पाठ्यपुस्तके दिली. होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याने, विद्यार्थी आणि पालकांनाही शिक्षणाची गोडी वाटू लागली. त्या काळात अस्पृश्य म्हणून वागवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याची सोय केली. ज्या मुली, मुले, पुणे, मुंबई येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी जात त्यांना सुद्धा शिष्यवृत्ती देण्यात येत होती. अशे महान शैक्षणिक क्रांती चे जनक म्हटल्या जाणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम अजित कॉन्व्हेंट, चांदुर बिस्वा येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसाह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post