मलकापूर दि.31 मे 2024,स्थानिक नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भो. चांडक विद्यालयात दि.31 मे रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.दिल्ली येथे कार्यरत असलेले विशाल रावत यांनी आपले आजोबा स्वातंत्र सैनिक स्व. दामोदरदासजी रावत यांच्या 25 व्या पुण्यस्मरणानिमित्त चांडक विद्यालतील गरीब व गरजू विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी मा. ता. संघचालक ज्ञानदेव पाटील, मा. नगर सहसंघचालक श्री राजेशजी महाजन, प्राचार्य डॉ.जयंत राजूरकर यांची उपस्थिती होती.हया प्रसंगी विशाल रावत यांचा यथोचित सत्कार प्रा.डॉ.राजूरकर यांनी केला . सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले मी याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून आज दिल्ली येथे मोठया पदावर कार्यरत आहे, हया शाळेतील माजी प्रा. भाऊसाहेब डोरले, मराठे सर,असेरकर मॅडम,शास्त्री सर, नारखेडे सर,हरिभाऊ पाटील सर, खराटे सर,ह्यांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटत असून मी या शाळेचे उपकार जीवनात कधीही विसरू शकत नाही, भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांना मदतीची आवशकता वाटल्यास मला सेवेची संधी द्यावी असे नम्र आवहान त्यांनी हया प्रसंगी केले. उपस्थित गरजू विदयार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हया कार्यक्रमाला ली. भो. चांडक विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वातंत्रसैनिक स्व. दामोदरदासजी रावत यांच्या पुण्यस्मरणनिमित गरजू विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप...
Hanuman Sena News
0
Post a Comment