शेगाव : तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय युवतीसोबत समाजमाध्यमावर ओळख करून घेत तिचे शोषण केले. मनाविरुद्ध वागली तर अश्लील फोटो व्हिडीओ व्हायरल करून जीवे मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील एका युवकासह त्याच्या चार ते पाच सहकारी मित्रांविरुद्ध शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी युवतीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यामध्ये युवतीचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले. ती नोकरीनिमित्त पुणे येथे गेली होती. तेथे सचिन साहेबराव जोगदंडे (२८, रा. चिचोली, ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) याने तिच्यासोबत समाजमाध्यमावर मैत्री केली. त्याच्याबाबत संपूर्ण खोटी माहिती देत जाळ्यात अडकविले. तसेच संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी मुलीचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ नकळत बनवले. त्यामध्ये कॉम्युटरच्या साह्याने दुरुस्ती करून ते मुलीच्या नातेवाइकांमध्ये व्हायरल करेल, अशा धमक्या देत तिला ब्लॅकमेल केले. वेळोवेळी मारहाण केली. त्यामुळे पीडित मुलगी दबावात त्याच्यासोबत राहत होती.आरोपीसोबत त्याचे तीन ते चार मित्रही त्याला सहकार्य करीत आहेत. ९ मे रोजी आरोपीने फिर्यादीला फोन करून मुलगी हवी असेल तर दोन लाख रुपये आणून दे, अन्यथा, फोटो व व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३८५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत.
समाजमाध्यमावर ओळखीतून युवतीचे शोषण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; वडिलांकडे मागितली होती रक्कम...
Hanuman Sena News
0
Post a Comment