बुलढाणा: 17 मे मोताळा सर्कल मध्ये कार्यरत असलेले लाईनमन गुणवंत विश्वनाथ सांगवे यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी मूर्ती नजीक एका इलेक्ट्रिक फोलवर चढून ते दुरुस्तीचे काम करीत होते. करंट लागल्याने ते फेकल्या गेले. त्यांना तातडीने बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे कळते. काल दुपारच्या दरम्यान अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. महावितरण कळुन ठिकठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू आहेत. आपला जीव धोक्यात घालून वायरमन-लाईनमन इलेक्ट्रिक पोल तसेच डीपी वर चढून कामे करत असतात. लोकांच्या घरात उजेड राहावा म्हणून दुरुस्तीचे कामे करताना अनेकदा वायरमन अपघातात मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्या परिवाराचे उर्वरित आयुष्य अंधारात जाते. म्हणून महावितरण तसेच राज्य शासनाने अपघाती मृत्यू झालेल्या वायरमनच्या कुटुंबीयांना शहीद सैनिकाच्या धर्तीवर आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणी महावितरण तर्फे करण्यात येत आहे.
खांबावर चढलेल्या वायरमनला लागला शॉक : उपचाराआधीच मृत्यू...
Hanuman Sena News
0
Post a Comment