मलकापूर: विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शारीरिक गुणवत्ता वाढीमध्ये शारीरिक शिक्षक हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात असे प्रतिपादन स्थानिक नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात 1 मे 2024 रोजी सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात उत्तर देतांना सत्कार मुर्ती जी. टी. तायडे यांनी व्यक्त केले.नगर सेवा समिती व लीलाधर भोजराज चांडक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य भाऊसाहेब डोरले तर प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यवाह श्री दामोदरजी लाखाणी, श्री सुगनचंदजी भंसाली, श्री माधवराव गावंडे, श्री संजयजी चांडक, प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर हे होते.शिक्षकांतर्फे श्री शरद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले,त्यांनी तायडे यांच्या शालेय कारकिर्दीवर प्रकाश टाकला तसेच ते म्हणाले श्री तायडे हे मनाने दिलदार,त्यांचे बोलणे दमदार,वागणे जबाबदार,तर नेतृत्व शानदार असे व्यक्तिमत्व आहे. तर प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांनी तायडे यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाबाबत त्यांचा गौरव करतांना शाळेचा मुख्य आधार स्तंभ म्हणून काम केले असे ते म्हणाले.या प्रसंगी निरोप समारंभला उत्तर देतांना श्री जी. टी. तायडे यांनी क्रीडा शिक्षकाची शाळेत भूमिका ही सर्वात महत्वाची असून आजच्या धाकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कायमस्वरूपी आदर निर्माण करतो तोच खरा आदर्श शिक्षक आहे.तसेच सर्वांनी आपसात सुसंवाद ठेवावा, कारण सुसंवादतूनच सकारात्मक वातावरणाची निर्मिती करता येते, असे उदगार त्यांनी याप्रसंगी काढले.अध्यक्षीय समारोप करतांना भाऊसाहेब डोरले म्हणाले तायडे हे खऱ्या अर्थाने एक झपाटलेले क्रीडाशिक्षक होते. त्यांनी पालकाच्या भूमिकेतून विदयार्थ्यांची काळजी घेतली.आयुष्यभर स्वतःला शाळेसाठी वाहून घेतले.कार्यक्रमाचे संचालन श्री गणगे यांनी तर कार्यक्रमांची सांगता श्री विजय अंबुसकर यांनी पसायदानाने केली.
शाळेत क्रीडा शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची -जी. टी. तायडे
Hanuman Sena News
0
Post a Comment