मलकापूर : भगवान विष्णूंचे सहावे अवतार ब्राह्मणांचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव अक्षय तृतीया 10 मे रोजी पूर्ण विश्वात साजरा केला जाणार आहे.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्याद्वारे दरवर्षी मलकापूर नगरात भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगाने यावर्षीही भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. काल ब्राह्मण सभा येथे घेण्यात आलेल्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये यावर्षी दिनांक पाच मे ला परशुराम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद शाळा क्रिडा संकुल येथे करण्यात येणार आहे तसेच सहा मे रोजी लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावे या करिता चित्रकला, निबंध विषय स्वातंत्र्यवीर सावकर फॅन्सी ड्रेस स्पर्धा विषय भारतीय योद्धे/क्रांतिकारक आयोजन ब्राह्मण सभा येथे करण्यात आलेले आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडी द्वारे महिला व मुलींकरता विविध स्पर्धांचे आयोजन किड्स झी शाळा येथे 7 मे रोजी सायंकाळीं करण्यात येणार आहे.अक्षय तृतीया 10 मे रोजी सकाळी सहा वाजता गोमातेचे पूजन करून चारा वितरण सकाळी 10.30 वाजता पर्यावरण पूरक भव्य सायकल रॅली चे आयोजन ब्राह्मण सभा येथून चांडक शाळा येथे दुपारी 12 वाजता भगवान जन्मोत्सव आरती व शांती पाठ द्वारे होणार आहे.सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन मलकापूर शहरातून सांस्कृतिक पद्धतीने करण्यात येणार आहे . परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांमध्ये सर्व बहु भाषीय ब्राह्मण बंधू भगिनी यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ च्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment