Hanuman Sena News

नको त्या अवस्थेत सापडल्याने एकाकडून मारहाण...









शेगाव : अचानक घरी आल्याने नको त्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील एका परिसरात १४ एप्रिल रोजीच्या पहाटे २ वाजता घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गजेंद्र मधुकर बाळापुरे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.शहर पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी निवडणुकीच्या कामासाठी १३ एप्रिल रोजी रात्रीच्या कर्तव्यावर होते. तब्येत बिघडल्याने रात्री २ वाजता घरी परतले. त्यावेळी पत्नीला काॅल केला. तसेच दरवाजा उघडण्याचे सांगितले. घरात गेल्यानंतर पुरुषाची चप्पल आढळली. तसेच लगतच्या खोलीतील पंखा सुरू असल्याने त्यांनी विचारणा केली. पत्नीने उडवाउडवीची उत्तरे दिली. खोलीचा दरवाजा उघडला असता आरोपी गजेंद्र बाळापुरे नको त्या अवस्थेत दिसून आला. त्याला विचारणा केली असता बाळापुरे याने फिर्यादीस मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४४८, ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकाँ करुटले करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post