Hanuman Sena News

देशी बनावटीची पिस्टल व काडतुसे जवळ बाळगणाऱ्या जोडप्यास पकडले, स्था.गु.शा.ची कारवाई...


 

जळगाव जामोद: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 निःपक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दला कडून खबरदारीच्या विवीध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर अनुशंगाने जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या पोलीस स्टेशन पो.स्टे. सोनाळा, तामगांव, जळगांव जामोद हद्दीमध्ये देशी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल), काडतुसे व ईतर हत्यारांची तस्करी, खरेदी-विक्री तसेच असे घातक हत्यारे जवळ बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवून, त्यांना मुद्देमालासह पकडून, त्याचेवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. बी.बी. महामुनी स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर संबंधाने पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी, स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदारांची विवीध पथके तयार करुन, त्यांना अवैध देशी पिस्टले, काडतूस बाळगणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कारवाई करण्यात आली.दि.23/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबर मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील एक जोडपे जळगांव जामोद परिसरामध्ये फिरत असून, त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूसे आहेत. वरुन स्था.गु.शा.चे पथकाने जळगांव जामोद हद्दीतील निमखेडी फाटा येथे सापडा रचून, यातील खालील आरोपींना पकडले. पकडलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणी पो.स्टे. जळगांव जामोद येथे कलम 3/25 अग्नी शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये अशोकसिंग नंदासिंग पटवा वय ५० वर्षे, रा. पाचोरी ता. खकनार जि. बुरहानपुर (म.प्र.) एक महिला आरोपी वय 40 वर्षे.आरोपी कडून देशी बनावटीचे 02 नग अग्नीशस्त्र (पिस्टल) मॅग्झीनसह कि. प्रत्येकी 40,000/-रुपये प्रमाणे 80,000/-रुपये, 23 नग जिवंत काडतूस किं. 23,000/-रुपये,एक मोटार सायकल किं. 70,000/- रुपये
असा एकूण 1,73,000/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाई दरम्यान चोरीच्या गुन्ह्याची उकल आरोपी यांचे कडून जप्त केलेली मोटार सायकल ही पो.स्टे. दारकापूरी जि. इंदोर (म.प्र.) येथील गुरनं. 772/2022 कलम 379 भादंवि या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे दिसून आले. सदर बाबत संबंधीत पो.स्टे.शी संपर्क करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे गुन्ह्यातील ईतर आरोपीतांचा शोध व तपास सुरू आहे.नमुद गुन्ह्यामध्ये सदर देशी पिस्टल आणि काडतूसे खरेदी करण्यासाठी कोणी येणार होते काय? याचा तपास करण्यात येत असून, त्या करीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी यांचे नेतृत्वामध्ये स्था.गु.शा.चे विशेष पथक तयार करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. जळगांव जा. यांचे कडून करण्यात येत आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन व श्री. सुनिल कडासने पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. अशोक थोरात अपोअ खामगांव, श्री बी.बी महामुनी - अपोअ - बुलढाणा, श्री. डी.एस. गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. श्री. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी, सपोनि, आशिष चेचरे, पोहेकॉ. दिपक लेकुरवाळे, ऐजाज खान, पोना. गणेश पाटील, युवराज राठोड, पोकॉ. गजानन गोरले, मपोकॉ. आशा मोरे स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post