जळगाव : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात 'नणंद विरुद्ध भावजय' अशी लढत रंगणार आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याचप्रमाणे आता रावेर लोकसभा मतदारसंघातही 'नणंद विरुद्ध भावजय' अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने अॅड. रोहिणी खडसे यांना उभे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बारामतीप्रमाणेच रावेर लोकसभा मतदारसंघातही हायव्होल्टेज लढत होऊ शकते.भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राजकीय खेळी करीत भाजपपुढे आव्हान निर्माण करण्याची तयारी केली आहे.नाशिक येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत रक्षा खडसेंविरोधात अॅड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे रावेरमध्येही 'बारामती पॅटर्न' दिसू शकतो.
रावेरलाही होणार 'नणंद वि. भावजय'...
Hanuman Sena News
0
Post a Comment