खामगाव: शहरासह परिसरात अश्लील व्हीडीओ व्हायरल होत असतानाच, खामगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाच्या मोबाईलमध्ये काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो असून तो अनेकांना फोटो पाठवित असल्याची निनावी तक्रार शहर पोलीसांना प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला.खामगाव शहरासह तालुक्यात गत काही दिवसांपासून अश्लील व्हीडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले असतानाच, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलाच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे आक्षेपार्ह फोटो असल्याची निनावी तक्रार पोलीसांना प्राप्त झाली. मुलींचे आक्षेपार्ह फोटो इतराना दाखवून तसेच इतर मुलामुलींना मोबाईलच्या माध्यमातून शेअर करुन मुलींची बदनामी करीत होता.या प्रकारामुळे एखाद्या मुलीचा संसार उध्दवस्त होण्याची तसेच अपमान सहन न झाल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येवू शकते असेही निनावी पत्रात म्हटले होते. या निनावी पत्राची दखल घेवुन शहर पोलिसानी उपरोक्तआरोपीविरूध्द भादंवि कलम ३५४ (अ), सहकलम ६६(ड), ६७ आयटी अक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, मुलगा अल्पवयीन असल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे.
मुलींचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल...
Hanuman Sena News
0
Post a Comment