मलकापूर: दि. 23 मार्च 2024 स्थानिक नगर सेवा समिती मलकापूर द्वारा संचालीत ली. भो.चांडक विद्यालयात दि 23 मार्च रोजी बलीदान दिनाच्या औचीत्याने विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बलीदान दिना निमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य गिरीशजी वैद्य तर प्रमुख अतिथी म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे मलकापूर विभागाचे प्रमुख ओम शिंदे हे होते.या प्रसंगी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचे हस्ते छत्रपती शंभुमहाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बलीदान दिना निमित्त सर्वप्रथम शहीद भगतसिंह, राजगुरू, व सुखदेव यांना विनम्र अभिवादन करून छत्रपती शंभूराजांच्या बलीदानाची कथा विद्यार्थ्यांना सांगितली. छत्रपती शंभूराजाचे बलीदान हे अविस्मरणीय असे आहे, इतिहासात कोठेही अशा प्रकारे प्रदिर्घ काळ यातना दिल्याचे दिसत नाही. संभाजीराजाना 3 फेब्रुवारी १६८९ रोजी मोगलाच्या हाती सापडले. औरंगजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. मोगल छावणीत शंभूराजांची प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. त्यांच्या देहाची कातडी रोज सोलण्यात येत होती. तरीही शंभूराजे जराही उगमळले नाहीत, महाराजांचे दोन्ही हात आणि पायल तोडण्यात आले.हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला औरंगजेबाच्या आदेशानुसार अमावस्येला शंभूराजाचे मस्तक धडावेगळे केले गेले. ते शंभूराजाचे मस्तक भाल्यावर टांगून मोगली छावणीतून आसूरी आनंदात मिरवण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे करून वदु या गावाजवळ टाकण्यात आले. सतत 39 दिवस यमयातनाचा स्विकार करून देव धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी बलीदान शंभूराजांनी ज्वलंत आदर्श उभा केला. संभाजीराजे मृत्युन्जय धर्मवीर बनले. शंभूमहाराजांचा हा इतिहास विद्यार्थ्यांनी सदैव स्मरणात ठेवावा असे आवहान त्यांनी केले अध्यक्षीय समारोप गिरीशजी वैद्य तर कार्यक्रमाचे संचालन सौ. सुरडकर मॅडम यांनी केले.
देव, धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शंभूछत्रपतींचे बलीदान- ओम शिंदे
Hanuman Sena News
0
Post a Comment