मलकापूर दि - 20 मार्च स्थानिक- लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात अभिरूप संसद कामकाज संपन झाले.मतदार जागृती अभियाना अंतर्गत विद्यालयात मुख्याध्यापक डॉ. जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभिरूप संसद कामकाजा विषयी माहिती मिळावी यासाठी 'मॉक पार्लमेंट'या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले. यामध्ये विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.संसदेच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर कु.प्रगती वानखडे हिने सभापती म्हणून काम काज पाहिले उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना सभापतींनी शपथ दिली. त्यानंतर विधिवत कामकाज सुरु झाले. अनेक सदस्यांनी राष्ट्रीय तसेच आपल्या मतदार संघातील समस्यांबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केले. त्यावर संबधीत विभागाच्या सदस्यांना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही सदस्यांनी संसदेत गदारोळ घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तेंव्हा मा. सभापतीनी सर्व सदस्यांना शांत करून कामकाज सुरळीत पार पाडले यानंतरच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना EVM, VVPAT च्या आधारे चालणारी मतदान प्रक्रिया या विषयी प्रोजेक्टरवर चित्रफित दाखविण्यात आली.त्याच प्रमाणे संसदेच्या कामकाजावर आधारित प्रश्न मंजुषा व पोस्टर निर्मिती चा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. हया कार्यक्रमामुळे विद्यार्थांमध्ये लोकशाही मधील संसदेचे महत्व व मतदान प्रक्रिया या विषयी अमूल्य मार्गदर्शन मिळाले.
चांडक विद्यालयात अभिरूप संसद कामकाज संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment