Hanuman Sena News

मी बारामती लढवणारच.. अजित पवारांवर हल्लाबोल करत विजय शिवतारेंची घोषणा...


पुणे: लोकसभा निवडणूका लवकरच जाहीर होणार असून बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार यांना चॅलेंज दिलंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य केलं. बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला. यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांचा शिवतारेंना पाठिंबा आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. म्हणून पवार-पवार करण्याएवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं’ असा निर्धार व्यक्त करत शिवतारे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला."पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल चढवला. 2019 च्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला पण तो राजकारणाचा भाग होता, निवडणुकीत कर्तव्य म्हणून केलं होतं. त्यात काहीच वैयक्तिक नव्हतं. पण अजित पवार यांनी नीच पातळी गाठली. मी २३ दिवस रुग्णालयात होतो, ट्रीटमेंट सुरू असतानाही मी अँब्युलन्समधून प्रचार केला. तेव्हा (माझी) पालखी जाणार, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय ? तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे खोट बोलत आहात, असा गलिच्छ आरोप त्यांनी केला. खालच्या थरावर ते उतरले. तू पुढे कसा निवडून येतोस तेच मी पाहतो, अशी धमकीही त्यांनी दिल्याचा आरोप शिवतारे यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post