रमंतो तत्र देवता ll
नांदुरा : जिथे नारी-महिलांचा आदर करून पूज्य भाव व्यक्त केला जातो,तिथे देव देवता ही रमतात,निवास करतात,वैदिक पौराणिक काळापासून आलेल्या 'देवी सुक्त' मध्ये याचा उल्लेख आहे. नारी ही शक्तीचं रूप आहे , संपूर्ण जीवन दुसऱ्यासाठी वाहून देणारी, प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडणारी, समाजामधे पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रगती करत आहे.८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. विद्येची आराध्य दैवत माँ शारदा,राजमाता जिजाऊ, झांशीची राणी लक्ष्मीबाई तसेच सर्व मुलींना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये महिला व मुलींना महिला आघाडी शहर प्रमुख सरिताताई बावस्कार यांनी महिला दिनाबद्दल माहिती देऊन 'महिला हिच शक्तीचं रूप' या विषयावर संबोधन केले. महिला उपशहर प्रमुख प्रज्ञाताई तांदळे यांनी उपस्थित महिला व मुलींना शिवसेना पक्षाबद्दल व माननिय शिंदे साहेब यांच्या महिलांच्या जनहिताच्या कार्यावर प्रकाश टाकला. शिवसेना संघटनेच्या कार्याला प्रेरित होऊन उपस्थित महिलांन मधुन तीन महिलांनी शिवसेना संघटनेमधे प्रवेश घेतला आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा वसा व वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. यासोबतच राजमाता जिजाऊ व युवानायक स्वामी विवेकानंद जयंती निमित्त शिवसेना शहराच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आले. सर्वांनकडुन नारी शक्तीचे नारे देऊन आत्मशक्ती जागृती केली. सदर कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक महिला व असंख्य मुली उपस्थित होत्या.
Post a Comment