मलकापूर: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत व महाशिवरात्रीनिमित्त शिवशक्ती नगर मधील महिलांनी गृह उद्योग स्थापन केला या गृह उद्योगाचे अनावरण मा.जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा पंचायत राज व ग्रामविकास सह संयोजिका महाराष्ट्र प्रदेश सौ. उमाताई शिवचंद्र तायडे व सामाजिक कार्यकर्त्या तथा मलकापुरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ रियाताई चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते " शिवशक्ती गृह उद्योगांच्या " महिलांना आयकार्ड देऊन सन्मानित करण्यात आले अध्यक्षा आरतीताई येशी, उपाध्यक्षा उषाताई पाटील, सचिव सुवर्णाताई भंडारी, सहसचिव सोनूताई राजपूत, संपर्कप्रमुख किरणताई चांडक, सहसंपर्कप्रमुख मनिषाताई देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार सावित्रीबाई फुले ,त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला व दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी रियाताई चोपडे यांनी महिला दिन का स्थापन करण्यात आला.? याबद्दल महिलांना संबोधित केले व महिलांना त्यांच्या बलिदान संघर्ष आणि यशाच्या स्मरणार्थ समर्पित आणि सन्मानित महिलांच्या उत्पन्नासाठी त्यांचे समान हक्क सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या चळवळीचे स्मरण करून दिले. तसेच अध्यक्षीय भाषणात उमाताईंनी अनावरण करण्यात आलेल्या " शिवशक्ती महिला गृह उद्योगाला" भविष्यात कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याची ग्वाही दिली. व महिलांचे अधिकार आणि लिंग समानतेबद्दल जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न होतो. आपल्या समाजात महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय यश संपादन केले आहे. या गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना एकमेकांशी जोडण्याची संधी मिळते. एकत्रितपणे एकमेकांना मदत करून त्या जीवनात पुढे जाऊ शकतात. आणि इतर गरजू महिलांना देखील मदत करू शकतात.असे उमाताई तायडे यांनी सांगितले. तसेच " शिवशक्ती महिला गृह उद्योगा" मार्फत महाशिवरात्रीनिमित्त फराळाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजबळ सर यांनी केले तसेच नानाभाऊ येशी यांनी आभार मानले .यावेळी संपूर्ण परिसरातील महिला व पुरुष मंडळी प्रचंड समूहाने उपस्थित होते यावेळी नंदूसिंह राजपूत, कैलास मामा पाटील, प्रशांत सिंह राजपूत,पंकज भंडारी, करण राजपूत, प्रेम पाटील,विजय चव्हाण, राजूभाऊ झनके, लखन चांडक ,रॉबिन राजपूत,भोलनकर सर,म्हस्कर सर ,धुरंदर सर ,अखिलेश गव्हाळ प्रशांत पाटील, गजानन निंबाळकर, रुपेश देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले
जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधत शिवशक्ती नगर मधील महिलांनी स्थापन केला गृह उद्योग...
Hanuman Sena News
0
Post a Comment