खामगाव : महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असताना,एक धक्कादायक आणि तितकाच लज्जास्पद प्रकार खामगाव शहरातून समोर आला आहे. त्यामध्ये डॉक्टरच हैवान बनला आहे.की,उपचाराकामी आलेल्या रुग्ण महिलेला गुंगीचे औषध देवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल २९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.डॉ. प्रशांत भगत असे या वासणाधिन डॉक्टराचे नाव असल्याचे समजते आहे.शुध्द आल्यानंतर आपल्यासोबत घडलेला अपप्रकार लक्षात येताच पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत वासणाधिन डॉक्टराविरोधात तक्रार दिली.त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी थोडक्यात घटनाक्रम असा की, २८ फेब्रुवारीला पिडीत महिला अकोट येथून खामगाव शहरातील घाटपुरी भागात डॉ. प्रशांत भगत याच्या होमिओपॅथिक रुग्णालयात उपचारासाठी आली. उपचारा दरम्यानच डॉ. प्रशांत भगत याने गुंगीचे औषध देवून अत्याचार केला.असे तक्रारीत म्हटले आहे.पिडीतेला शुद्ध आल्यानंतर झालेला प्रकार समजताच तिने लगेचच शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून डॉक्टर विरोधात तक्रार नोंदवली.त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी डॉक्टर प्रशांत भगत विरुद्ध ३७६ ,३७६ (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय खांबलकर हे करीत आहेत.
धक्कादायक ! डॉक्टर बनला हैवान; आधी गुंगीचे औषध दिले नंतर नको ते केलं...
Hanuman Sena News
0
Post a Comment