मलकापूर, 9 फेब्रुवारी 2024 आज भाजपा, मलकापूर कडून मलकापूर येथील भाजपा कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्री. यश संचेती भाजपा युवा मोर्चा, जिल्ह्याध्यक्ष ह्यांच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधी यांनी केलेल्या जातीवाचक वक्तव्याचा जोडे मारो आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केले. राहुल गांधी ह्यांच्या विरोधातील घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.भाजप कार्यालय, बिर्ला रोड येथे दुपारी एक वाजल्यापासून हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये मलकापूर भाजपचे प्रमुख पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते.राहुल गांधी यांनी एका भाषणात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली जात बदलल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली. ते म्हणाले, "मोदी ओबीसी असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत. गुजरातमधील भाजप सरकारच्या कार्यकाळात 2000 मध्ये ओबीसी यादीत समाविष्ट झालेल्या 'घांची' जातीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपली जात बदलून ओबीसी केली.भाजपच्या कार्यायकर्त्यांनी ह्या विधानावर जोरदार टीका करत हे भारतीय संविधान आणि समाजाच्या आदर्शांच्या विरोधात असल्याचे मानले आहे . समाज बिघडवणाऱ्या आणि लोकांमध्ये मतभेद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा विचारांना विरोध करणार असल्याची ग्वाही ह्या आंदोलनातून दिली गेली. भारतीय राज्यघटनेच्या आदर्शांशी पूर्ण बांधिलकीचे प्रतिबिंब म्हणून हे आंदोलन महत्वाचे ठरले आहे.या आंदोलनावेळी मा. श्री. मोहनजी शर्मा, मा. श्री. शंकररावजी पाटील, मा. श्री. अमृत काका बोंबटकर, मा. श्री. बबलूभाऊ देशमुख, मा. श्री. संजयजी काजळे, मा. श्री. योगेशजी पटणी, मा. श्री. मिलिंदजी डवले, मा. श्री.विजयजी अढाव, मा. श्री. शुभमजी बोबडे, मा. श्री. विनोदजी आकोटकर, मा. श्री. विशालजी माधवानी, मा. श्री. बबलू जमदार, मा. श्री. रवीजी वानखडे , मा. श्री. अजय भाऊ नांदुरकर , मा. श्री. निलेशजी जैस्वाल , मा. श्री. देवीनजी टाक, मा. श्री. दुर्गेशजी राजापुरे ,मा. श्री. अमोलजी टप , मा. श्री. रवींद्रजी रायपुरे, मा. श्री. गोपालजी पाटील, मा. श्री. गावत्रेजी यांच्यासह भाजपा युवा मोर्चा मलकापूर शहर व ग्रामीणचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप कार्यालय, बिर्ला रोड येथे राहुल गांधींनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ह्यांच्या संबंधात केलेल्या जातीवाचक वक्तव्यावर भाजपकडून जोडे मारो आंदोलन
Hanuman Sena News
0
Post a Comment