Hanuman Sena News

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धनगर आरक्षण अंमलबजावणी आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देत तहसीलदारांना दिले निवेदन...






मलकापूर: बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या धनगर आरक्षण अमलबजावणी आमरण उपोषणाला जाहीर पाठींबा देत सकल धनगर समाज मलकापूर तालुक्याच्या वतीने बुलढाणा येथे आमरण उपोषन करत असलेल्या नंदूभाऊ लवंगे यांना जाहीर पाठींबा देत निवेदन दिले.अनेक वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न प्रलंबित आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाची आर्थिक सामाजिक, राजकीय परिस्थिती बिकट असून,आजही हा समाज वंचित आहे त्यामुळे मलकापूर तालुक्याच्या वतीने उपोषणाला जाहीर पाठींबा, तसेच मागण्यांची पूर्तता तत्काळ न झाल्यास हा लढा अजून तीव्र करण्यात येईल यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको व लाक्षणिक उपोषणे करण्यात येतील त्यामुळे जर रहदारीला काही अडचण निर्माण झाल्यास याला पूर्णपणे शासन व प्रशासन जवाबदार राहील. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी मधू भाऊ फासे,महादेव लटके,अनिल पाचपोळ,रवींद्र कवळकर,मंगेश गावंडे,राहुल खोंदले, स्वप्नील कवळे,अमोल पाचपोळ,ईश्वर बोरसे,ज्ञानेश्वर लवंगे,निलेश सोनोने,गजानन बोरसे,ऋषी नेमाडे,ई मलकापुर सकल धनगर समाज मलकापूर शहर व तालुका उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post