चिखली : २२ जानेवारी २०२४...तो दिवस अजून जिल्हा विसरला नाही..२० ते २२ वर्षे तरुणीचा नग्न अवस्थेतील अर्धवट जळालेला मृतदेह चिखली ते अंचरवाडी दरम्यान असलेल्या असोला शिवारातील बंद पडलेल्या हॉटेल राजवाडा मागे सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.घटनास्थळी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.वाटल होत लागेल शोध तिचे मारेकरी सापडतील पण आता या घटनेला महिना उलटून गेलाय अजून कशाचाच पत्ता नाही पोलीस म्हणतात आम्ही लावू शोध पण त्यात तेवढा आत्मविश्वास दिसत नाही..! त्यामुळे त्या बिचारीला न्याय मिळेल का ? असा सवाल उपस्थित होत आहे.तरुणीच्या उजव्या हातावर दिलं चे चिन्ह आणि Sk गोंदलेले होते. तिच्या गळ्यात दागिने असल्याने ती विवाहित असावी असा अंदाज आहे.मात्र ती कोण होती? याची ओळख अद्यापही पटली नाही. पोलिसांनी महाराष्ट्रातील ३८ हजार बेपत्ता झालेल्या महिला ,मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी केली पण त्यापैकी कुणीही "ती" आपली असल्याचे सांगितले नाही.वैद्यकीय अहवालात तीच्यवर आधी बलात्कार केला नंतर गळा आवळून डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला आणि नंतर तिला जाळण्यात आल्याचे म्हटले आहे.पोलिसांसमोर दररोज नवनवीन आव्हाने असतात रोजचे क्लिष्ट गुन्हे आहेत.त्या सगळ्या तपासातून तरुणी आणि तिच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी सुद्धा पोलिसांना वेगळा वेळ काढावा लागणार आहे.ती जर जिल्ह्यातील किंवा परिसरातील असती तर आतापर्यंत कुणीतरी येऊन आमची लेक बाळ गायब असल्याचे सांगितले असते.मात्र कदाचित ती जिल्ह्यातील नसावी असा अंदाज आहे.मात्र केवळ एका बाजूने विचार करून चालणार नाही.ती दूरची असेल तर इथपर्यंत कशी आली असेल? तिला कुणी आणले असेल घटनास्थळी सापडलेलं तूप, वात ही काय भानगड होती? असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. दुसरीकडे एवढी मोठी घटना होऊन,मुलगी गायब होऊन देखील तिचे कुटुंबीय तिला शोधण्यासाठी पुढाकार घेत नसतील तर? यामागेही काही वेगळे कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्थात आता ती कोण होती? याचा शोध लागल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरे मिळणे अशक्य आहे.मात्र पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावावाच लागेल.
"महिना उलटला तरी "तिचे" मारेकरी अजूनही मोकाट! "ती" कोण होती याचाही उलगडा झाला नाही; असोला हद्दीत मारून जाळलेल्या तरुणीला कधी मिळेल न्याय?
Hanuman Sena News
0
Post a Comment