मलकापूर: दि.२५ फेब्रुवारी बदलत्या जीवनशैलीनुसार बदलत्या कौटुंबिक समस्या व त्यावर उपाय सुचवणारे घरा घरातील वृद्धाश्रम या सामाजिक विषयावर व्याख्यानाचे आयोजन व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज सायंकाळी ५:३० वाजता अमरावती येथील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.आजच्या सामाजिक परिस्थितीवर आणि कौटुंबिक समस्यांवर प्रकाश टाकून त्याबाबत उपाययोजना सुचवणारे या व्याख्यानात कुटुंबातील वयोवृद्ध मंडळींचे प्रश्न त्यांची मानसिकता व ती समजून घेण्याकरिता तरुण पिढीला आवश्यक असणारे सर्व मुद्दे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमात श्रोत्यांकरिता येथील नुतन विद्यालयाच्या प्रांगणात १००० खुर्च्यांच्या ची व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहिती व्हाईस ऑफ मीडिया मलकापूरच्या वतीने देण्यात आलेली आहे. म्हणून मलकापूर शहरातील तमाम युवा ज्येष्ठ तथा वयोवृद्ध माता भगिनी यांना निवेदन करण्यात येते की या व्याख्यानासाठी आपण अवश्य उपस्थित राहावे.व्याख्यान कार्यक्रम दि. २५ फेब्रुवारी रविवार सायंकाळी ५:३० स्थळ नुतन विद्यालय मलकापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आज "घरा घरातील वृद्धाश्रम" व्याख्यान...
Hanuman Sena News
0
Post a Comment