Hanuman Sena News

मुलाला ठार मारण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न...



 खामगाव : मुलगा आमच्या ताब्यात आहे. तातडीने एक लाख रुपये न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी देत रक्कम उकळण्याचा प्रयत्न खामगाव येथील सुरेंद्र हरनारायण करनाणी यांच्यासोबत घडला. मात्र, धमकी असल्याने तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.याबाबत करनाणी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये त्यांचा मुलगा चंदन (१९) हा संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथे शिक्षण घेत आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास सुरेंद्र करनाणी हे दुकानात असताना त्यांच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला.तसेच, मुंबई पोलिस क्राइम बॅचमधून बोलत आहे. तुमच्या मुलाजवळ ड्रग्ज आढळून आले, त्याला तुरुंगात टाकणार अशी धमकी दिली. यावेळी करनाणी यांनी मुलाशी बोलणे करून द्या, असे म्हटले असता अज्ञात व्यक्तीने १ लाख रुपये ऑनलाइन पाठवा, नाही तर मुलाला मारून टाकतो, अशी धमकी दिली.त्यामुळे करनाणी यांनी खात्री करून घेण्यासाठी मुलगा चंदन याच्या मोबाइलवर संपर्क साधला.त्यावेळी तो शेगाव येथे कॉलेजमध्ये परिक्षा देत होता.यानंतर सुरेंद्र करनाणी यांच्या मोबाइलवर वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून लवकर पैसे पाठवा,नाही तर मुलाला मारून टाकू,अशा धमक्यांचे फोन येत असल्याचे म्हटले. त्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post