Hanuman Sena News

चुकीच्या मोबाइलवर पैसे पाठवले ?


चिंतेचे कारण नाही, बँकेला पुरावे दिल्यास पैसे पुन्हा तुमच्या खात्यात 




नवी दिल्ली : यूपीआयद्वारे पैसे पाठविताना अनेकदा नजरचुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक दाबला जातो.त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे हस्तांतरित होतात.अशावेळी आपल्याला पैसे परत मिळू शकतात का? चला याबाबत जाणून घेऊया.पैसे हस्तांतरित करताना आपल्या  हँडसेटमध्ये संचयित असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यास,चुकीच्या व्यक्तीला पैसे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.मात्र,क्रमांक मोबाइलच्या फोनबुकमध्ये नसेल, तर . थेट क्रमांक टाकून तुम्ही पैसे पाठवू शकता.मात्र,त्यात एक आकडाही चुकीचा दाबला गेला,तरी चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठविले जातात.त्यात मुख्य अडचण अशी असते की, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसता.अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीस लगेच फोन करून झालेला प्रकार सांगून पैसे परत करण्याची विनंती करू शकता. त्याने पैसे परत केले नाही,तर मात्र तुम्हाला नियमांनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल. तज्ञांनी सांगितले की चुकून भलत्याच व्यक्तीला पैसे पाठविले गेल्याची तक्रार तुमच्या बँकेकडे तातडीने करा पैसे पाठविल्याशी संबंधित पुरावे बँक तुमच्याकडे मागेल खात्री पटल्यानंतर तुमचे पैसे परत मिळण्याची प्रक्रिया बँकेकडून सुरू करण्यात येईल चुकीच्या हस्तांतरणाची तक्रार 'एनपीसीआय'च्या वेबसाईटवरीही करता येऊ शकते. https://www.npci.org.in असा वेबसाईटचा पत्ता आहे. या वेबसाईटवरील तक्रार निवारण सेक्शनमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदविता येते.

Post a Comment

Previous Post Next Post