मलकापूर: दि.०५ फेब्रुवारी सालाबदाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा अतिशय भव्य दिव्य व सर्वसमावेशक पद्धतीने साजरा होण्याच्या दृष्टीने प्रथम नियोजन बैठकीचे आयोजन येथील युवाशक्ती व्यायाम शाळेच्या मैदानावर करण्यात आले दि. ४ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित या बैठकीला शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध व्यायाम शाळा, गणेश व नवदुर्गा मंडळांचे कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तथा ज्येष्ठ मंडळी यांच्यासह युवकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी आयोजन समिती द्वारे शिवराज जाधव यांनी १९ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजेपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याबाबत माहिती दिली. तसेच उपस्थितांकडून नवीन संकल्पना व सूचना ऐकून घेतल्या. त्यानुसार यंदाच्या शिवजयंती उत्सव शिस्तीत, शांततेत व सर्वसमावेशक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी सर्वांनी उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ मंडळींनी उपस्थित युवकांना शिवजयंती व्यसनमुक्त व वादविवाद विरहित संपन्न होण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन यावेळी केले. बैठकिचे संचालन प्रा डॉ नितीन भुजबळ यांनी केले. (१ ) यावेळी काय विशेष• शहरातील शालेय विद्यार्थी सहभाग.लेझीम पथक, ढोलपथक व लाठीकाठी पथकांचे पारंपरिक शौर्य सादरीकरण• सायंकाळी गुणवंत विद्यार्थी, प्रतिभावान खेळाडू व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार.• शिवचरित्रावर आधारित आकर्षक देखावे व शिस्तबद्ध लेझिम पथकांना बक्षिसे व गुणगौरव.• शिवछत्रपतींच्या जिवणावर प्रकाश टाकणारे सांस्कृतिक कार्यक्रम.• ग्रामीण मंडळांचाही राहणार सहभाग.• शिवजयंतीच्या निमित्ताने दि.२५ फेब्रु रोजी नुतन विद्यालय प्रांगणात सायं ६ वा."घरा-घरातील वृद्धाश्रम" या सामाजिक समस्येवर भाष्य करणारे व्याख्यान.(२ ) कार्यक्रमाचे स्वरूप दि.१९ फेब्रुवारी २०२४ सोमवार • सकाळी ८ वा छ. शिवाजी नगर येथे आई भवानी पुजन व शिवपुतळा माल्यार्पण.• ८:३० वा छ.शिवाजी नगर येथून महिला मोटारसायकल रॅली.• ९ वा हनुमान चौक येथून बसस्टँड पर्यंत शालेय विद्यार्थी लेझीम, ढोल पथक व चित्ररथ प्रभात फेरी• ०९ :३० गो.वि.महाजन शाळा क्रीडांगण येथुन मोटारसायकल रॅली.• १० वा बसस्टँड येथून ऑटो रिक्षा रॅली.• दुपारी १२ वा हनुमान चौक येथून भव्य शोभायात्रा व मिरवणूक. सायं ७ वा हनुमान चौक येथे समारोपीय बक्षीस वितरण समारंभ.
सार्वजनिक शिवजयंती आयोजना निमित्त प्रथम नियोजन बैठक संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment