मलकापूर : दि. ०५/१/२०२४ शुक्रवार रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत मो.ते.संचेती विद्यालय देवधाबा येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सव ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डवले सर, प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्याध्यापक श्री मोरे सर गोविंद विष्णू महाजन ज्युनिअर कॉलेज प्रा डॉ नितीन भुजबळ, प्रा इंगळे सर के के मोरे सर ,सपकाळ सर, गणेश माळी सर,इंगळे सर, बोरसे सर ,सोळंके सर ,सुरवाडे सर आदी उपस्थित होते.ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होऊन आगामी काळात उज्वल भविष्याच्या दिशा निश्चित करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गोविंद विष्णू महाजन जुनिअर कॉलेजच्या माध्यमातून जिजाऊ सावित्री जन्मोत्सवाची निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील ९७ विद्यार्थ्यी सहभागी झाले. त्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस वर्ग १० चा प्रणव भास्कर बोरसे द्वितीय क्र. वर्ग १० चा कृष्णा रामा मुंढे तर तृतीय क्रमांक वर्ग ८ चा कृष्णा सुभाष बोरसे व ९ ची मोहिनी सुर्यभान भोंडेकर या विद्यार्थ्यांनी पटकाविले. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.जिजाऊ सावित्री जन्मोत्सव ज्ञान स्पर्धाचे आयोजक प्रा. डॉ. नितीन भुजबळ यांनी यावेळी सांगितले की, विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून असे उपक्रम हे वारंवार घेतले जातील व त्यात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभागी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंदनशिव सर यांनी केले.
संचेती विद्यालयात जिजाऊ सावित्री ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण...
Hanuman Sena News
0
Post a Comment